Sharad Pawar : कोणी दम देत असेल तर मला सांगा मी त्यांच्या घरीच जातो, बारामतीत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य..


Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

शरद पवार हेदेखील युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ते पहिल्यांदाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असे म्हणत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाला इशारा दिला आहे. Sharad Pawar

तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून कारखान्यातील सभासद आणि कामगारांना दम दिला जात असल्याचे सांगत पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांच्या हितासाठी मी अनेकदा मदत केली आहे.

मी कधीही त्यांची जात बघत नाही, माझी जात शेतकरी आहे. कुठलाही साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर मी पक्ष बघितला नाही, सरसकट मदत केली. तुमच्या सभासदांना, कामगारांना दम दिला जात आहे, असे प्रकार घडल्यास मला कळवा. मी त्यांच्या घरीच जातो. लोकशाहीमध्ये मत देण्याचा अधिकार सर्वांना आहे.

एका चेअरमनने कामगाराला नोकरीवरुन काढून टाकतो असे सांगितल्यानंतर मी थेट त्यांना फोन केला. कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. कोणाला दम दिला, तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा पवार यांनी सोमेश्वरनगर येथे झालेल्या सभेत दिला.

मला त्या रस्त्याने जायचे नाही, माणसे आपली आहेत. माणसे चुकली असतील, तर बाबांनो आपण कधी असे वागू नका, असा सल्लाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा सोमेश्वरनगर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!