Sharad Pawar : शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, राजकीय परिस्थितीत पत्र नेमकं कशासाठी? चर्चांना उधाण….

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सातत्याने राज्य सरकारचे लक्ष वेधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थिती सोडवण्यासाठी बैठक घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
पत्रात नेमकं काय?

मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर पोस्ट केलेल्या पत्रात, शरद पवार म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थिती कमी करण्यासाठी राज्य सरकारने सिंचन योजना सुरू केल्या होत्या, परंतु अलीकडेच त्यांनी यापैकी काही भागांना भेट दिली तेव्हा त्यांच्या अंमलबजावणीमध्ये कमतरता दिसून आली
या दौऱ्यांमध्ये जनतेशी झालेल्या संवादात गावकऱ्यांनी शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी मागण्या केल्या आणि काही उपाययोजनाही सुचवल्या, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे. Sharad Pawar
पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमध्ये पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबईत तुमच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी, ही विनंती. असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
दरम्यान, या प्रस्तावित बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मृद-जलसंधारण आणि पाणीपुरवठा मंत्री यांनीही उपस्थित राहावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांनी सीएम शिंदे यांना केली आहे.
या बैठकीत पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.