Sharad Pawar : तुम्ही फक्त ‘ते’ काम करा मग कस निवडून येत नाही ते मी बघतो!! शरद पवार यांचे मोठं वक्तव्य…


Sharad Pawar : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना शरद पवारांनी साताऱ्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोठे विधान केले आहे.

शरद पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवारांनी काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

शरद पवारांनी यावेली कार्यकर्त्यांना आवाहन केले. ‘तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू’, असे शरद पवार यावेळी म्हणाले. Sharad Pawar

महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा की आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो असा निर्धार यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!