शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार; अमोल कोल्हे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!..


Amol Kolhe : राजकारण तोंडावर आले असून राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता यावर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बुधवारी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आमदार-खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत राज्यातील सद्यस्थिती आणि राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादीचे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आणि अनिल देशमुख यांनीही या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

तसेच वेगळे निवडणूक चिन्ह घेऊन लढण्याची आमची तयारी आहे, आम्ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. आमचे निवडणूक चिन्ह अद्याप ठरलेले नसून आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!