Sharad Pawar : शरद पवारांनी अखेर टाकला मोठा डाव?, समोर आली मोठी माहिती…


Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आता विधानसभा निवडणुक देखील जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पवारांनी आज तिघा महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

या तिघांमध्ये ए.वाय. पाटील, के.पी. पाटील आणि अशोकराव जांभळे यांचा समावेश आहे. हे नेते अजित पवार गटाशी संबंधित आहेत आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे अजित पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये राधानगरी भुदरगडसाठी तिकीट मिळवण्यासाठी के.पी. पाटील आणि केवाय पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. v

यावर शरद पवार योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, अशोकराव जांभळे यांनी हातकणंगले मतदारसंघात शरद पवार गटाने उमेदवार उभा राहावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, येत्या काळात पवार गटात सामील होणारे समरजित घाटगे हे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात उभे राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात तणावपूर्ण लढाई होण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!