Sharad Pawar : नितीशकुमार भाजपचा हाथ सोडणार? शरद पवारांनी दिली थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर….


Sharad Pawar : लोकसभा निवडणूक निकालात भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने मुंसडी मारत विक्रमी यश प्राप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर येत आहे. भाजप प्रणित एनडीएला मोठा धक्का बसला आहे.

एक्झिट पोलमध्ये साडेतीनशे ते पावणे चारशेच्या आसपास पोहचवलेल्या भाजपला प्रत्यक्ष निकालात तीनशे पार पोहचणेही अवघड होऊन बसल्याचे दिसून येत आहे.त्याच धर्तीवर आता इंडिया आघाडीने आता सत्तेच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

अशातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना इंडिया आघाडीकडून मोठी ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूची चांगली कामगिरी केली आहे. Sharad Pawar

त्यामुळे सध्या एनडीए आघाडीचे घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांशी आघाडीतील वरिष्ठ नेते संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीत मित्रपक्ष सोबत आले तर त्यांना मोठे पदं दिले जाण्याची शक्यता आहे.

नितिश कुमारांना फोन करून शरद पवारांनी उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. शरद पवारांवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंचा कधी या गोटात तर कधी त्या गोटात जाण्याचा इतिहास आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबुंची स्वबळावर सत्ता येत आहे. यामुळे नायडू आणि कुमार निकालानंतर बाजू पलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group