Sharad Pawar : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मोठा राडा! मराठा समाज आक्रमक, नेमकं घडलं काय?

Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार थांबलेल्या हॉटेमध्ये जोरदार राडा झाला आहे.
शरद पवार थांबलेल्या हॉटेल रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.
न त्यानंतर शरद पवार यांनी या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं आहे. शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. Sharad Pawar
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालचे पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या, यामुळे या हॉटेलबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी शरद पवार यांनी बोलावून घेतले आहे.