Sharad Mohol : शरद मोहोळवर गोळीबार कोणी केला? समोर आले ‘ते’ नावं, सोबत असलेल्यांनीच…

Sharad Mohol : पुणे शहरात भरदिवसा गोळीबार झाला आहे. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (ता.५) दुपारी अज्ञातांना गोळीबार केला होता. त्यामध्ये जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला.
त्याच्यावर गोळीबार करणार्याचे नाव निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळसोबत असणार्यांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यापैकी एकाच नाव समोर आले आहे.
साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार केलेला आहे. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनीच गोळीबार केल्यामुळे आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करीत आहेत.
शरद मोहोळ कोण आहे?
मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै २०२२ मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते.
शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.