कोंढव्यात २५ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने कुरिअर बॉयची केली बतावणी, तोंडावर केमिकल स्प्रे मारला अन्…,घटनेने पुणे हादरले


पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश मिळवला आणि तोंडावर केमिकल स्प्रे करत पीडितेवर अत्याचार केला आहे. घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत असून, मूळची अकोल्याची आहे.

ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत काम करते. आरोपीने बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून दरवाज्याशी बोलणी केली आणि सहीची जबाबदारी असल्याचं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं. त्याच क्षणी त्याने तोंडावर केमिकल स्प्रे करून तरुणीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

कोंढव्यातील गार्डेड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेली ही संतापजनक घटना सोसायटीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित करते. आरोपीने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने कुरिअर बॉय असल्याचे भासवत प्रवेश मिळवला. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी त्याची नीट चौकशी केली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीच्या ओळखीवर काम सुरू आहे.

दरम्यान, सुरक्षारक्षकांची हलगर्जीपणा आणि कमी पडलेली पडताळणी ही या घटनेतील गंभीर बाब ठरते. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला असून, गुन्हेगार लवकरच सापडेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!