पुण्यात सेक्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश, अनेक मुलींची सुटका


पुणे : परराज्यातील महिलांना वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन त्यांना सेक्स रॅकेटमध्ये आणले जात होते. त्यांना वेश्या व्यवसाकरीता पंचतारांकीत हॉटेल येथे पाठवुन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये अनेक महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत दोन पिडीत मुली व तीन एजंट (आरोपी) मिळुन आले आहेत. त्यांना ताब्यात घेवुन तीन आरोपी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरून आलेल्या 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. सुरक्षा विभागाच्या वतीने सापळा रचुन बनावट ग्राहक बनवून वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली, असता एजंटने पुणे स्टेशन परीसरातील पंचतारांकित हॉटेल येथे दोन रुम बुक करण्यास सांगितले.

पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी करीत आहेत. अचानक छापा टाकला असता, या ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवून विचारपुस केली. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजेंटसह देवडा परीसरात असल्याची माहिती मिळाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!