आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींचा सौदा! समीर वानखेडेंवर खळबळजनक आरोप
मुंबई : अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
आता त्याला अटक केलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर दोन दिवसांपुर्वी सीबीआयने छापा टाकला होता.
यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना या प्रकरणी सीबीआय’च्या तपासातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत सीबीआयने वानखेडे यांच्यावर आरोप पत्रात गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती.
पण हा सौदा १८ कोटींवर आला. यात किरण गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतले होते. इतकेच नव्हे तर, वानखेडेंना इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, याचाही हिशोब देता आला नाही, तसेच फॉरेन ट्रिपचाही हिशोब देता आले नाही. असे काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.