नामांकित कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री, उरुळी कांचन येथे एकावर गुन्हा दाखल…


उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे आंतरराष्ट्रीय बाजारातील नामांकित अशा सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बनावट साहित्यांची विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा प्रकार मंगळवारी (ता.२७) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गारवा हॉटेल समोर, सोलापुर-पुणे रोडचे बाजुला गट नं. 351 मधील राठोड जिप्सम एजेन्सी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण सोहनलाल राठोड (वय.२६, सध्या रा. कृष्णा बिल्डींग, फ्लॅट नं. 530, डाळिंब रोड, उरुळी कांचन ता. हवेली), मुळ रा. कंदरी, ता. कंदरी, जि. बाजमेर, राज्य, राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साजिद असगरअली अन्सारी (वय.३४, काम-नोकरी, रा. स्पाईनरोड, भोसरी, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही सेंट-गोबेन या फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय शाखा आहे. सेंट-गोबेन बांधकाम आणि औद्योगिक बाजारपेठांसाठी साहित्य आणि सेवा डिझाइन, उत्पादन आणि वितरण करते.

साजिद अन्सारी यांना सोलापुर-पुणे रोडच्या बाजुला गारवा हॉटेल समोर, गट नं. 351 मधील राठोड जिप्सम एजेन्सी येथे लक्ष्मण राठोड याचे दुकान व गोडावून आहे. या गोडावूनमध्ये सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बनावट साहित्य तयार करून विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राठोड याच्या दुकानाच्या आतील गोडाऊनमध्ये सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनाच्या डीझाईनची कॉपी केलेले बनावट बॉटम, डिझाईन पट्टी व डिझाईन पॅरामिटरचा माल हा गोडावुनमध्ये आढळून आला.

तसेच सदरचा माल हा तयार करून ओरीजनल असल्याचे भासवुन विक्रीसाठी साठवणुक केल्याचे आढळून आले. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!