बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये बँका १२ दिवस बंद राहणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी..

पुणे : एक दिवसांनी जून महिना सुरू होणार आहे. नवीन महिना सुरू होण्याआधी अनेकजण सुट्ट्यांचे नियोजन करतात. विशेषतः जूनपासून पावसाळ्याची सुरुवात होत असल्यामुळे काहीजण प्रवासाचे प्लॅन करतात, तर काहीजण आर्थिक नियोजनात व्यस्त असतात आणि त्यांना बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतात.
जून २०२५ मध्ये देशभरातील बँका एकूण १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सुट्ट्या, प्रादेशिक सण, तसेच दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे. तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं असेल, तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. ..
जून २०२५ मध्ये बँक सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे..
१ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
६ जून (शुक्रवार) – ईद-उल-अधा (बकरीद) – केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद.
७ जून (शनिवार) -बकरी ईद (ईद-उल-जुहा) – देशभरातील बँका बंद.
८ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
११ जून (बुधवार)- संत गुरु कबीर जयंती/सागा दावा – सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद.
१४ जून (शनिवार) -दुसरा शनिवार (देशभरात).
१५ जून (रविवार) -साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
२२ जून (रविवार)- साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
२७ जून (शुक्रवार)- थयात्रा/कांग (रथयात्रा) – ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद.
२८ जून (शनिवार)- चौथा शनिवार (देशभरात).
२९ जून (रविवार)- साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
३० जून (सोमवार) – रेमना नी – मिझोरममध्ये बँका बंद.