नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फुस लावत पळवून नेणाऱ्या आरोपीला बेड्या, लोणी काळभोर पोलिसांची कारवाई…


पुणे : नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनींला फुस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

युवराज सोमनाथ सोनवणे (वय-२२, रा लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही लोणी काळभोर येथील एका नामांकित शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच तिने लोणी काळभोर येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे. अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. तेव्हा आरोपी सोनवणे याने अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणाचे आमिष दाखवून फुस लावली आणि तिला पळून घेऊन गेला होता.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार आरोपी सोनवणे यांच्या विरोधात भा.द वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सोनवणे याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!