संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण ; वाल्मीक कराडच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची मागणी


पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असुन या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) सार्वजनिक करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवराज बांगर यांनी केली आहे.तसेच जिल्हा कारागृहातील शासकीय फोनवरून देखील वाल्मीक कराड बाहेरील लोकांशी संपर्क साधत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडीमुळे देशमुख हत्या प्रकरणात आणखी वादंग माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य आरोपी वाल्मिक कराडच कारागृहातील तपासादरम्यान जप्त झालेला मोबाईल प्रत्यक्षात वापरत होता, आणि त्याचा सीडीआर मिळवून तो जनतेसमोर आणावा. केवळ एवढेच नव्हे तर,. या दोन्ही संवाद माध्यमांचा गैरवापर होत असल्याने, संपूर्ण तपास होणे आवश्यक असल्याचे बांगर यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.यामुळे हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडला राजकीय पाठिंबा आहे का ? हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. तसेच आरोपीच्या कारागृहातील विशेष ‘सोयी’बाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान वाल्मिक कराडवरच्या या आरोपांमुळे जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि प्रकरणाच्या तपासाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!