’10 जूनपूर्वी संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार’

मुंबई : राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असा दावा भाजप आमदार नितेश राणा यांनी केला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

नितेश राणे मम्हणाले, येत्या १० जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. या दाव्यानंतर नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वार पलटवार पाहायला मिळत आहे. सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा फोकस अजित पवार यांच्यावर आहे.
अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणताय, अजित पवार यांच्या वावड्या उठवून मविआचे नेते त्यांची बदनामी करताय. तर दुसरीकडे शिंदेंचेच नेते म्हणताय अजित पवार लवकरच युती सोबत येतील.

यामुळे काय होणार हे आता तरी सांगता येणार नाही. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीमान्याआधी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी आणि भाजपच्या सरकारची शक्यता वर्तविली होते. यामुळे चर्चांना उधाण आले होते.
आता नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यावर स्वतः संजय राऊत काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर मात्र ठाकरे गटाकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.