पक्ष सोडणाऱ्यांशी लढण्याशी शरद पवार यांचा गनिमी कावा! संजय राऊत यांनी सांगितली आतली बातमी…

मुंबई : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांचा पक्ष सोडणाऱ्यांशी लढण्यासाठी गनिमी कावा वापरत आहेत. असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे. तसेच त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) रणांगणात लढत असल्याचेही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही युद्धाची भूमी आहे. एक मैदानावरचे युद्ध आणि एक गनिमी काव्याने लढलेले युद्ध, अशी दोन युद्धे महाराष्ट्रात लढली गेली. आम्ही मैदानात उतरून युद्ध लढतोय.
शरद पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. तो म्हणजे गनिमी काव्याचा. ते त्यांच्या पक्षातील लोकांशी गनिमी काव्याने लढत आहेत. आम्ही शस्त्र वापरून हे युद्ध लढत आहोत. दोन्ही युद्धात आम्हाला यश येईल.याची खात्री आहे.
शरद पवारांच्या भूमिकेकडे आम्ही वेगळ्या नजरेने पाहत आहोत. राष्ट्रवादीतील फुटीबाबत आपल्याकडे पत्र आले नसल्याचे नार्वेकर म्हणालेत. पण दुसरीकडे शिवसेनेच्या बाबतीत मात्र आम्ही फूट पडल्याचे स्पष्टपणे दाखवले तरी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नार्वेकर कुठलीही भूमिका घेत नाहीत. याला ढोंग म्हणतात. शरद पवार यांच्या भूमिकेविषयी काल ग्रँड हयातमध्ये आम्ही सर्वांशी चर्चा केली. कुणाच्याही मनात संभ्रम नाही.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्येही फूट पडली, हे कोणीही नाकारू शकत नाही. जशी शिवसेनेत फूटून एक गट वेगळा झाला आणि पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.
हा पक्षद्रोह आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली. ही फूट आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरुद्ध भाजपशी हातमिळवणी केली. याला फूटच म्हणता येईल. असेही ते म्हणाले