भीमा पाटस प्रकरणी भाजप नेत्यानेच केला संजय राऊत यांचा सत्कार, दौंडमध्ये चर्चांना उधाण…!

दौंड : दौंड भाजपचे आमदार राहुल कुल हे अध्यक्ष असलेल्या पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार आणि पाचशे कोटींच्या कथित भ्रष्टाचाराबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत ईडी आणि सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राऊत यांनी केली होती.
त्यामुळे मागील काही दिवसापासून दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस सहकार बचाव समितीचे नामदेव ताकवणे यांनी संजय राऊत यांचा सत्कार केला आहे. खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला.
त्यांच्यामुळे मागील अनेक वर्षांपांसून सुरू असलेल्या भीमा पाटस बचाव लढायला गती मिळाली. मुंबई येथे जाऊन खासदार संजय राऊत यांचा सत्कार केल्याचे ते म्हणाले. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, यावेळी भीमा सहकार बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांचा सत्कार केला. भिमा सहकारी साखर कारखान्याबाबत पाठपुरावा चालू होता. सरकारच्या व सहकार विभागाच्या प्रादेशिक साखर संचालकाच्या स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली होती, असेही ते म्हणाले.
भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराची माहिती संपूर्ण राज्यभर पसरली. खऱ्या अर्थाने भीमा सहकार बचाव समितीने जो लढा चालू ठेवला होता त्याला अधिक गती मिळाली, असेही ते म्हणाले. यामुळे आता हा वाद वाढणारच आहे.