Sangli News : जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकलं मन! ओ साहेब…पोते उचलायला मदत करता का?, साहेबांनी लगेच…

Sangli News सांगली : अनेक शासकीय अधिकारी अगदी सामान्य माणसांसारखेच जीवन जगत असतात. आपली पद, प्रतिष्ठा बाजूला ठेऊन समाज भान राखून आजही अनेक शासकीय अधिकारी काम करतात. असाच एक अनुभव सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आला. Sangli News

निवडणूक आयोगाची मिटिंग आटोपून बाहेर येताच त्यांना एका व्यक्तीने ओ साहेब.. पोते उचलायला जरा हात लावता का? अशी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही मागचापुढचा विचार न करता मदत करण्याचा दृष्टीने एक नव्हे दोन नव्हे तर तीन कांद्याची पोती छोट्या कांदा विक्रेत्यास उचलून खांद्यावर दिली. Sangli News
हा व्यक्ती एक मोठा अधिकारी आहे हे त्या व्यापाऱ्यास माहीत नव्हते. यामुळे त्याने देखील निसंकोचपणे याबाबत विचारले. तसेच आपण ही पोती उचलून देत असताना आपण जिल्हाधिकारी आहे हे विसरून त्यांनी मदत केली.

याचे एक सुखद अनुभव या निमित्ताने बघायला मिळाला. यामुळे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे क्षण चित्र त्यांचे मित्र उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी टिपले आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून बाहेर येताच त्यांना रस्त्यावर असलेल्या कांदा विक्रेत्याने अचानक ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का? अशी विचारणा केल्याची हाक ऐकू आली.
जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांनी लगेच मागचा पुढचा विचार न करता त्यांनी तीन कांद्याची पोती उचलून डोक्यावर दिली. त्यांच्याबरोबर उपवनसंरक्षक राहुल पाटील काही अंतरावर होते त्यांनी ही हे क्षण आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपले. सहकारी आपले चित्र टिपतायत याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांना नव्हती.