Sangli News : आंघोळीच्या साबणावरून झाला नवरा बायकोमध्ये वाद, बायकोला आला राग, बायकोने नवऱ्याचा हात पकडीत धरून….; घटनेने सगळेच हादरले
Sangli News : नवरा बायकोत कशामुळे वाद होतील सांगता येत नाही. सांगलीतून अशीच एक घटना समोर आली आहे. आंघोळीच्या साबणावरून नवरा बायकोत वाद झाला. अन् बायकोने थेट नवऱ्याचा अंगठाच फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना ८ मे रोजी संजयनगर येथील पाटणे प्लॉटमध्ये घडली आहे. याप्रकरणी सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यातच १३ मे रोजी बायकोसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या बायकोला साबण दिसला नाही. त्यामुळे तिने नवऱ्याला साबण कुठे ठेवला? असं विचारलं. नवऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि उडवा उडवीची उत्तर दिली. याचं रूपांतर वादात झाला. Sanagli News
त्यानंतर हाणामारीही झाली. हाणामारी दरम्यान, रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. त्यावर संतापलेल्या बायकोने स्वयंपाक घरातली पक्कड घेतली आणि थेट नवऱ्याचा अंगठाच फोडला. Sangli News
दरम्यान, नवरा बायकोमधील भांडणं काही नवीन नाहीत. मात्र एक साबणामुळे दोघांतील भांडणाच प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं हे आश्चर्यकारक आहे. या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे.