ब्रेकिंग ! वाळू माफियांचे धाबे दणाणले, राज्यात वाळू निलाव कायमचे बंद करणार, सरकारचा निर्णय…!

मुंबई : वाळू निलाव आणि यामध्ये होणाऱ्या अनेक गैरगोष्टींमुळे राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाळू धंद्यामुळे मुठभर लोक धनदांडगे झाले, पण यामुळे नद्या, नदी किनारे आणि शेतकरी उध्वस्त झाले आहेत.

यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

विखे पाटील यांनी सांगितले की, वाळूचे काय झाले लोक विचारतात. पण आता मी राज्यातील नद्यांमधून वाळू उपसा पूर्णपणे बंद करणार आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या बेसुमार वाळू उपश्यामुळे काही मुठभर लोक धनदांडगे झाले आहेत.

यामुळे नद्यांचे पाणी आणि प्रवाह धोक्यात आले, नदी किनारे व शेतकरी उध्वस्त झाले आहेत. आमचे सरकार लोकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेणारे सरकार आहे. वाळू लिलाव बंद करणे हेच शेतकरी हितासाठी आवश्यक आहे.
तसेच यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. या संदर्भात लवकरच मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा करून हे धोरण जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
