Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर राडा! झाली तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर पेट्रोल पंप चालक आणि टोल कर्मचा-यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या दुसरं बीड समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर हा संपूर्ण प्रकार घडला असून यात पेट्रोल पंप चालकाने टोल कर्मचा-यांवर चक्क रिव्हॉल्व्हर रोखल्याचे दृश्य टोल नाक्यावर लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
हाणामारीच्या या घटनेत चार जण गंभीर जखमी झालेची माहिती समोर अली आसून जखमींवर सध्या जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र दिवसा ढवळया घडलेल्या हा थरारक घटनेने सर्वत्र एकच दहशत निर्माण झाली आहे. Samruddhi Highway
सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत या प्रकरणात बिबी पोलीसात पेट्रोल पंप चालक आणि इतर चार जाणांविरुद्ध आर्म अॅक्ट आणि इतर अनेक कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.