Sambhaji Bhide : एकनाथ शिंदे लबाडी….!! मनोज जरांगे यांची भेट घेत संभाजी भिडे यांचे मोठे वक्तव्य…

Sambhaji Bhide जालना : आज श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लबाडी करणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत. तर अजित पवार काळीज असणारा माणूस आहे. त्यामुळे कृपया तुम्ही तुमचे उपोषण थांबवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी केली आहे.

तसेच आम्ही आज केवळ देखाव्यासाठी आलो नाही. तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत असू. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. तुम्ही मागे वळून पाहू नका.

ही धर्माची समस्या असून तुमच्या तपस्येला शंभर टक्के फळ येईल, आपण मोठ्या मुत्सद्दीपणाने हे उपोषण थांबवूया. मी तुम्हाला नाउमेद करायला आलो नाही, असे संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेले उपोषण अद्याप मागे घेतलेले नाही. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे.
मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांचा उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार तसूभरही ढळला नव्हता. मात्र, मंगळवारी अंतरवाली सराटी येथे संभाजी भिडे हे जरांगे यांच्या भेटीला आले तेव्हा उपोषणस्थळाचा नूरच पालटला.
