संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावला, रुग्णालयात उपचार सुरू..


सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगली शहरात एका कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाला कुत्र्याने चावा घेतला असून, त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घ़डला असल्याचे समोर आले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून भिडे गुरुजी आपल्या घरी जात होते.

तसेच त्याच वेळी भिडे गुरुजींवर कुत्र्यांनी अचानकपणे हल्ला केला आहे. कुत्र्याने भिडे गुरुजींच्या पायाचा चावा घेतला. दरम्यान, या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्यांना दुखापत झाली.

यानंतर त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज भासली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर धारकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!