Salman Khan : सलमान खानच्या खास मित्राचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाला, डुकरासारख खातो अन् श्वानासारख…


Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा खास मित्र विंदू दारा सिंह जो कॉलेजपासून त्याचा खास मित्र आहे. त्यांनी सलमानविषयी एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. याशिवाय त्यानं सांगितलं की सलमान त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनीचं नक्की काय करतो.

विंदू दारा सिंगनंने नुकतील सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सलमानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानं सलमान त्याच्या पॉकेटमनीचं काय करतो हे देखील सांगितलं. विंदूनं सांगितले की सलमान खान म्हणाला होता की ‘त्यानं जेव्हा माझी बॉडी पाहिली त्यानंतर त्यानं वर्कआऊट करण्यास सुरुवात केली होती.

मी नेहमीच त्याला एक गोष्ट सांगतो की तो ते जास्त करतोय. तो डुक्करासारखे खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो. सलमान जितके खातो त्यानंतर आम्ही त्याला विचारलं की भाई सगळे जेवणं जाते कुठे? त्यावर त्याचे नेहमी एकच उत्तर असते की तो त्याला बर्न करतो. खरंच संध्याकाळी करत असलेल्या वर्कआऊटमध्ये सलमान हेच करतो. मी खरंच सलमानवर खूप प्रेम करतो. तो खूप चांगला आणि मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. असं देखील तो म्हणाला आहे. Salman Khan

विंदूनं पुढे सांगितले की ‘सलमान खान आणि तो लहाणपणीचे मित्र आहेत. एक अभिनेता असण्यासोबतच ते एक चांगला माणूसही आहे. सलमान आज कोटींमध्ये पैसे कमावत असला, तरी आजही तो त्याचे वडील सलीम खान यांच्याकडून रोज पॉकेट मनी घेतो, असा देखील खुलासा त्याने केला आहे.

दरम्यान तो पुढे म्हणाला की, सलमानला पॉकेटमनी मिळालेल्या पैशांविषयी सांगत विंदू पुढे म्हणाला, ‘हे पैसे घेऊन सलमान त्याचा असिस्टंट नदीमकडे देतो. मग त्याचे वडील त्याला ५० हजार देओ किंवा मग १ लाख. ते सगळे पैसे तो गरीबांमध्ये वाटतो आणि आजही हे असंच सुरु आहे. असं देखील तो म्हणाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!