Salary of Sarpanch : निवडणुकीआधीच सरकारने केलं सरपंच-उपसरपंचांना खुश!! मानधनामध्ये दुप्पट वाढ, नेमकं किती मिळणार मानधन? जाणून घ्या…

Salary of Sarpanch : विधानसभा निवडणुकीआधी सरकारने राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांना मोठे गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात येणार आहे.
ग्रामविकास खात्याने हा निर्णय घेतला आहे, ज्याला मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन ३ हजारांवरून ६ हजार तर उपसरपंचांचं मानधन १ हजारवरून २ हजार रुपये करण्यात आलं आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ते ८ हजार आहे त्या सरपंचाचं मानधन ४ हजारवरून ८ हजार आणि उपसरपंचांचं मानधन १,५०० वरून 3 हजार करण्यात आलं आहे. Salary of Sarpanch
ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या८००० पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन रु. ५००० वरुन रु. १०००० तर उपसरपंचाचे मानधन रु.२००० वरुन रु. ४००० करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीनंतर राज्य शासनावर वर्षाला 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे.