उरुळीकांचनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सागर कांचन, माजी पंचायत समिती सदस्य काळुराम मेमाणे राष्ट्रवादीत दाखल; अजित पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश…


उरुळी कांचन : शरद पवार गटाचे नेते व उरुळी कांचन येथील जानाई डेव्हलपर्सचे मालक सागर (आबा) पोपट कांचन व शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांच्यासह शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत सोमवारी (ता. 13) चंदननगर परिसरात हा पक्षप्रवेश पार पडला.

आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा प्रवेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या घडामोडीने परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे माजी सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन, मयूर कांचन, माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव कांचन, शिवसेनेचे काळुराम मेमाणे, सुभाष बगाडे, सामाजिक कार्यकर्ते सागर बाळासाहेब कांचन, अक्षय वनारसे, सतीश कांचन, सदाशिव भागेपल्ले, मयूर कांचन, आशुतोष तुपे, अजित कासुर्डे, अजिंक्य संतोष कांचन, आदित्य यादव, राहुल थिटे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उरुळीकांचन पंचक्रोशीत सागर कांचन यांचा मजबूत जनसंपर्क, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि युवकांमध्ये असलेली पकड लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवकांनीही पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद दिली. या प्रवेशामुळे विद्यमान आमदार माऊली कटके यांची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली आहे.

उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात या प्रवेशाने राष्ट्रवादी ची ताकद निश्चित वाढणार असून दोन्ही राष्ट्रवादीच्या मलोमिलन या निमित्ताने घडल्याने राष्ट्रवादीला भक्कम आधार मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!