सांगलीत सराईत गुंड सचिन टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात..
सांगली : सांगलीमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
अहिल्यानगरमध्ये ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काही अज्ञात तरुण त्याच्या घरात घुसले. त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. काही मिनिटातच हल्ला करून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे . दरम्यान सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
उपचारादरम्यान मृत्यू
सचिन टारझन याच्यावर आज सकाळी सातच्या सुमारास धारदार शस्त्राने अहिल्यानगर परिसरात खुनी हल्लाकरण्यात आला. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान सकाळी १० वाजता त्याचा मृत्यू झाला आहे.