पुणे जमीन घोटाळा प्रकरणावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; तुम्ही सत्तेत असो वा नसो कारवाई….


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार पुण्यातील जमीन खोटाळा प्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. यावर काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.तुम्ही सरकारमध्ये असो किंवा नको जर चुकीची गोष्ट होत असेल तर कारवाई ही झाली पाहिजे. त्याबाबतची शहानिशा झाली पाहिजे, काय खरे काय खोटे हे लोकांपुढे आले पाहिजे. कारण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो. पाठिंबा देणारे काही अधिकारी असतात तर मग हे अधिकारी कोण? कशा पद्धतीने ते वागतात. अधिकारी काही लोकांनाच का महत्व देतात? काही लोकांचेच काम का होतात? गरीबाची का होत नाहीत. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, आमचे एकच मत आहे की, कुठल्याही नेता असुद्या, नेत्याच्या परिवारातील व्यक्ती असुद्या.. चूक केली असती तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई ही झाली पाहिजेत. पण ही कारवाई होताना भेदभाव कुठे झाला नाही पाहिजे याचही काळजी घेतली पाहिजे. पार्थ पवार प्रकरणात पहिल्यांदाच थेटपणे बोलताना आमदार रोहित पवार हे दिसले आहेत.

दरम्यान पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला. जो वादात सापडला. पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हेच नाही तर सतत होणाऱ्या आरोपांनंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला.

       

या अमोडिया कंपनीत पार्थ पवारचे 99 टक्के शेअर्स आहे तर 1 टक्के शेअर्स दिग्विजय पाटील याचा आहे. पार्थ पवारवर या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल झाला नाही पण 1 टक्का शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला. विरोधकांकडून या प्रकरणात अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्ट सांगितले की, या जमीन व्यवहाराबद्दल मला कल्पना नाही. मुले मोठी झाली आहेत आणि ते त्यांची व्यवसाय करतात असे त्यांनी म्हटले. आता आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच पार्थ पवार याच्या जमीन घोटाळा प्रकरणात बोलताना दिसले आहेत. कालच शरद पवार यांनी आपले मत मांडले असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चाैकशीची मागणी या प्रकरणात केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!