Rohit Pawar : राज्याच्या राजकारणात खळबळ! आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप, थेट भूखंड घोटाळा…


Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्या आणि भारताला करोडो रुपयांना फसवलेला उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून घाट घालत भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता एमआयडीसी व्हावी की काही ठराविक उद्योगपतींना आणि व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी रोहित पवार यांनी एकाच गावात एमआयडीसी करण्याचा अट्टाहास सुरू केला आहे.

एकाच ठिकाणी एमआयडीसी होण्याचा इतका आग्रह रोहित पवार यांचा का होता याचा अभ्यास केल्यानंतर फार मोठा भूखंड घोटाळा इथे उदयाला येत असल्याचे लक्षात आल्याचे उमेश पाटील म्हणाले. Rohit Pawar

ज्या कर्जत – जामखेडच्या पाटेगाव व खंडाळा येथील ४५८ हेक्टर म्हणजे जवळपास १२०० एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्याठिकाणी मूळ जमीनदार, शेतकरी आहेत. काही जमीनी द्यायला तयार आहेत तर काही गावे जमीनी देण्यास विरोध करत आहेत.

या गावातील जमीनींपेक्षा इतर गावात जी जागा आहे ती उपजत जागा आहे ती वापरली जाऊ नये असा लोकांचा आग्रह आहे. मात्र रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसी झाली पाहिजे हा आग्रह का आहे तर मुळ शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा घेतलेल्या उद्योगपतींना भरमसाठ मोबदला मिळावा यासाठी असल्याचा थेट हल्लाबोलही उमेश पाटील यांनी केला.

दरम्यान,यावेळी उमेश पाटील यांनी पाटेगाव, खंडाळा गावात ज्यांनी जागा घेतलेल्या त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सहा ते सात ठिकाणी जमीन आहे. याशिवाय महाजन, अग्रवाल, पोद्दार, छेडा, खन्ना, जैन, शेट्टी, मेहता यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लोकांनी रोहित पवार यांना निवडून दिले आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी केला.

संपादीत जमीनीमध्ये कवडीमोल दराने जमीनी खरेदी करता येत नाही हे रोहित पवार यांना चांगले माहित आहे. मात्र तरीही सन २०२१-२२ मध्ये जमीनी खरेदी केलेल्या आहेत. रोहित पवार यांना तरुणांच्या रोजगाराचा एवढा कळवळा आहे तर स्थानिक लोकांचा विरोध असताना रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसीचा आग्रह का आहे हा खरा चेहरा जनतेसमोर आता यायला लागला आहे, असेही उमेश पाटील म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!