उरुळीकांचन मध्ये भरधाव कंटेनरने तरुणाला चिरडले ! बेवारस महामार्गावरील अपघाती बळींनी नागरीकरण संतापले !!


उरुळीकांचन :पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील गजबजलेल्या ठिकाणी मालवाहू कंटेनरने तरुणाला चिरडण्याचा प्रकार घडला आहे.या अपघाताने दुरुस्तीपासून बेवारस पडलेल्या कवडीपाट ते कासुर्डी यादरम्यानच्या धोकादायक महामार्गाचे भयानक वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून या रस्ते अपघातात पडत असलेले मुडदे प्रशासन कधी थांबवणार ? असा संतप्त सवाल नागरीक विचारत आहे.

पुणे -सोलापूर महामार्गावरील बोरीभडक चौकात भरधाव सफारी वाहनाने महिलेचा जीव घेतल्यानंतर आता तिसऱ्याच दिवशी उरुळीकांचन येथील मुख्य चौक असलेल्या एलॉईट चौकापासून दिडशे फूट अंतरावरील गजबजलेल्या महामार्गावर सकाळी आठच्या सुमारास भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठिमागून धडक देऊन त चिरडल्याने तरुण जागीच ठार झाला आहे. तरुणाला चिरडून पळ काढण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शुभम रमेश लेचरूड (वय -२३, रा.डाळींब , ता.दौंड ) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूर दिशेने चाललेल्या कंटेनर क्र. (एम.एच.०४एल झेड २८११)भरधाव जात असताना दुचाकीवरून आश्रमरोड मार्गे महामार्गावरुन जात असताना कंटेनरने एलॉईट चौकापासून दिड फूटांवर दुचाकीलापाठीमागून ठोकर देऊन तरुणाला कंटेनर चिरडले. या अपघातात तरुण जागीच मृत्यूमुखी पडला आहे. या अपघातात कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी या महामार्गाची टोलवसुली मुदत ३१ मार्च २०१९ मध्ये संपल्यानंतर हा महामार्ग गेली चार वर्षे बेवारसरीत्या पडून आहे. हा महामार्ग एनएचआयकडे वर्ग होऊन ४ वर्षापासून महामार्गाची दुरुस्ती जैसे थे आहे. या दुरुस्तीकामाकडे लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार व खासदार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने महामार्ग दुरुस्तीचा मुद्दा चार वर्षांपासून जैसे थै आहे. या दरम्यानच्या महामार्गावर आणखी किती मुडदे पडणार म्हणून नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!