घरात कोंडून छळ, नोकरी सोडायला लावली अन् निवृत्त एसीपी सासऱ्याची सुनेकडे शरीर सुखाची मागणी; कोंढवा प्रकरणात खळबळ


पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात 30 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध गंभीर छळाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सासऱ्यावरही गंभीर आरोप करण्यात आले असून, सुनेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, पीडितेचे लग्न एप्रिल 2022 मध्ये विक्रांत घाडगे याच्यासोबत झाले होते. त्याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीने पत्नीला घरात कोंडणे, नोकरी सोडायला लावणे आणि सोशल मीडिया खाती बंद करण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे.

तसेच सासूने तिचे दागिने स्वतःकडे ठेवले आणि माहेरच्या लोकांचा सतत अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवृत्त एसीपी सासरे धमकावत असल्याचा दावा करत, “मी गुन्हेगारांना ओळखतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला माहीत आहे” असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच “आम्ही कायदा विकत घेऊ शकतो” आणि “तुला जिवंत गाडून टाकू” अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे.

याशिवाय पती विक्रांत घाडगे याचे इतर महिलांशी संबंध असल्याचा आणि पत्नीचा वारंवार अपमान केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. 8 मे 2026 रोजी वाद वाढल्यानंतर पीडिता माहेरी गेली आणि तिने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी पती, सासरे, सासू तसेच इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!