पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या संपूर्ण यादी…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. मागील काही वर्षांपासून पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे पाहणाऱ्या स्थानिक नेत्यांची आणि गावपुढाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. प्रत्येक सभापतीपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असणार आहे.

या सोडतीनुसार, राज्यातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बारामती पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली राहणार असून, इंदापूर पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी आरक्षित असेल.

१३ पंचायत समित्यांसाठी आरक्षणाचे निकाल पुढील प्रमाणे…
१) इंदापूर – अनुसूचित जाती
२) दौंड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३) पुरंदर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
४) शिरूर – नागरिकांचा मागासवर्ग महिला
५) मावळ – नागरिकांचा मागासवर्ग महिला
६) वेल्हे – सर्वसाधारण महिला
७) मुळशी – सर्वसाधारण महिला
८) भोर – सर्वसाधारण महिला
९) खेड – सर्वसाधारण महिला
१०) हवेली – सर्वसाधारण
११) बारामती – सर्वसाधारण
१२) आंबेगाव – सर्वसाधारण
१३) जुन्नर – अनुसूचित जाती जमाती महिला
या सोडतीनुसार, अनेक तालुक्यांतील महिला उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे.
