चक्रधर स्वामी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दत्तनगरच्या ७५० विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

आंबेगाव बु : आनंद दरबार दत्तनगर कात्रज येथे प्रजासत्ताक दिन प. पू. करुनाश्रीजी म. सा, प. पू. विभाश्रीजी म.सा आदी संतांच्या सानिध्यात व चक्रधर स्वामी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दत्तनगरच्या ७५० विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम स्केटिंग इनलाईन फ्रिस्टाईल स्लॅलम नॅशनल गोल्ड विजेती समिका खिंवसरा आणि नॅशनल सिल्व्हर विजेती आर्चरी जानवी पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.
यावेळी श्री चक्रधर स्वामी शिक्षण संस्थेचे महेंद्र कोंढरे, आरोग्य विभागाचे अमित शहा, कोथले सर, सुधीर कोंढरे, शंकरराव बेलदरे, पाठबन्धारे विभागाचे सल्लागार विलास कोटेचा, आनंद दरबारचे सर्व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष भंडारी, सुचिता कटारिया, निकिता कुवाड, दर्शन लोढा यांनी प्रयत्न केले. संतोष भंडारी यांनी आभार मानले. यावेळी नागरिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.