आयुष प्रसाद यांची बदली! आता पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण..


पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे साडेतीन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर्वाधिक साडेतीन वर्षे काम केले. दरम्यान आर. एस. चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे सीईओ चव्हाण यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. एस्सी (ॲग्रिकल्चर) ही पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे ते सन १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल सेवेत दाखल झाले.

त्यानंतर त्यांनी सातारा व सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महसूल विभागात सहसचिव आदी पदांवर काम केले आहे. त्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली आहे.

आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर होता.

शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा उभारण्यात आली. शाळांची गुणवत्तावाढ, कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुणे जिल्हा परिषदेत चांगले काम करत आल्याचा आनंद आहे.

मात्र करोना काळातील जिल्हा परिषदेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही याची खंत असल्याची भावना प्रसाद यांनी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!