शेतकऱ्यांसाठी दिलासा! पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार? शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? मंत्री बावनकुळेंनी दिली तारीख…


पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि अनैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खात्री राज्य सरकारने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंचनाम्यांचे काम ४ ते ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल आणि नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले आहे. पुरामुळे राज्यात ठीकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे.

याबाबत सर्व शेतकरी आणि विरोधी पक्षानी शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार तसेच सर्व विरोधी पक्षांनी राजाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

व काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२१५ कोटींची मदत जाहीर केली. आता ही मदत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भेटेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी व संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कळमेश्वर तालुक्यातील पाहणीदरम्यान बावनकुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आहे.

ऑगस्टमध्ये सरकारकडे २५ लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे आले होते.
सप्टेंबरमध्ये हा आकडा २२ लाख हेक्टर होता.
आतापर्यंत ५० लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!