भावा बहिणीच्या नात्याला भावाने लावला कलंक! मुलीवर बलात्कार, पोट दुखतंय म्हणून डॉक्टरकडे गेली अन् सगळेच हादरले…

सध्या नात्याला डाग उडवणारी घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद परिसरात समोर आली. याठिकाणी चुलत भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. या अत्याचारनंतर या अल्पवयीन मुलींने रुग्णालयात बाळाला जन्म दिला.
याबाबत माहिती अशी की, दिल्लीत एका विद्यार्थ्याने लोणी येथील ताहेरे भागातील अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने लैंगिक अत्याचाराचा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता भयंकर माहिती समोर आली आहे. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून अहवाल दाखल केला.
ती मुलगी मावशीकडे राहून नववीत शिकत होती. सुट्टीच्या दिवशी ती भावाकडे जायची. मार्चमध्ये शाळेला सुटी असताना ती लोणी येथील तिच्या आजीच्या घरी आली होती. त्यावेळी तिच्या चूलत भावाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि कोणाला सांगू नकोस असे सांगितले.
तिने देखील याबाबत कोणाला सांगितले नाही. तिला याबाबत काही समजले नाही. नंतर डिसेंबरमध्ये जेव्हा तिला पोटात दुखू लागले तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा सगळेच हादरले. तिथे तिने मुलाला जन्म दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत रुग्णालयाकडून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचे वय निश्चित करून पोलीस पुढील कारवाई करतील. अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेने मात्र सगळेच हादरले असून मुलीने याबाबत सगळी माहिती दिली आहे.