हवेलीत सातबारा दुरुस्तीची मोहिम नियमित राबवा – उपविभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. यशवंत माने यांच्या सूचना! हवेलीत महसूल सप्ताहाचे आयोजन…..


उरुळीकांचन : हवेली तालुक्यात सातबारा दुरुस्तीच्या संदर्भातील कामे महसूल विभागाने नियमित पध्दतीने मोहिम राबवून प्राध्याण्याने पूर्ण करावीत अशा सूचना हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांत )डॉ. यशवंत माने यांनी केले आहे.

महसूल दिनाच्या निमित्ताने शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ हवेली महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला.यावेळी हवेली महसूल विभागात सर्वोत्कृष्ट तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला . यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने हे बोलत होते.कार्यक्रमासाठी तहसिलदार किरण सुरवसे, नायब तहसिलदार सचिन आखाडे, स्वाती नरुटे, अजिनाथ गाजरे, अमोल कदम, राज्य महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिपक चव्हाण यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल ग्रामविकास अधिकारी, सेवक उपस्थित होते.

तहसिलदार किरण सुरवसे म्हणाले, हवेली तालुक्यात महसूल सप्ताह निमित्ताने तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील महसूल संदर्भात प्रलंबित असलेल्या नागरीकांची कामे मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या आहेत. महसूल सप्ताहात दिलेल्या उपक्रमात तालुक्यातील ३१ डिसेंबर २०११ पूर्वीची शासकीय अतिक्रमण झालेल्या पात्र, अपात्र अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात समितीकडे प्रस्ताव देण्यात येणार आहेत. यासंदर्भात कोंढवे -धाडवे परिसरात अतिक्रमण धारकांसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच पानंद, शिवरस्ते रस्तासंदर्भात मोरदरावाडी , रांझे ते कोंढणपूर वृक्ष लागवड ३ किलोमीटर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणार आहे. तर महाराजस्व अभिमान या उपक्रमातून कोथरूड येथे महाराजस्व अभिमान कार्यक्रम होणार आहे.महाईसेवा केंद्र, सेतू केंद्र संदर्भात ऑनलाईन सेवा दाखले तसेच पुरवठा कामे , संजय गांधी योजने लाभार्थ्यांची कामे अंतर्गत अभिमान राबविण्यात येणार आहे. सप्ताहात डीबीटी योजनेत ई -केवायसी संदर्भात अडचणी व त्रुटी दूर करण्यात येणार आहे. सप्ताहात कृत्रिम वाळू कार्यशाळा, गौणखनिज माहिती व रुपरेषा तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

हवेलीत चार महिन्यांत १ लाख दाखले वितरीत…

हवेली तालुक्यात ऑनलाइन दाखले वितरण प्रक्रियेत शासकीय संकेतस्थळावर अपडेशनच्या अडथळे येऊनही या सर्व गोष्टींवर मात करीत महसूल विभागाने मोठा विस्तार असलेल्या तालुक्यात या ऑनलाईन सुविधेवर तातडीने उपाय शोधीत तालुक्यात १ एप्रिल ते ३० जुलै पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसहीत उत्पन्नाचे दाखले, नॉनक्रिमिलेर, ज्येष्ठ नागरिक, रहिवासी दाखले इ. मिळून १ लाख १ हजार ५५ दाखले वितरीत करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुरवसे यांनी दिली.

सिंहगड अतिक्रमण मुक्त अभियान…

गड – किल्यांवरील अतिक्रमण हटाव मोहिमेत महसूल विभागाने किल्ले सिंहगड वरील अतिक्रमण हटविण्याची मोठी अवघड मोहिम महसूल विभागाने फत्ते केली आहे.  किल्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी अवजड यंत्रसामग्री गाढवांवर नेऊन विभागाने अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिकांशी योग्य सुसंवाद साधून काढल्याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.

दरम्यान कार्यक्रमात विभागाचे सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी रोहिदास जाधव, निवडणुकीचे कार्य सांभाळणारे महसूल सहाय्यक अंकुश गुरव, रवी फणसे, गोपाळ जाधव , मंडळ अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला, राजशिष्टाचार सेवा म्हणून सूर्यकांत पाटील, किशोर पाटील ,संदिप शिंदे, आपत्ती विभागात वर्षा वाळेकर, अर्चना ढेमरे पुरवठा विभागात अदित्य खताळ. अतिक्रमण हटाव मोहिम -सचिन चव्हाण साजेदा दहिटणकर , ई चावडी उपक्रम – प्रेरणा पारधे , प्रविण नलावडे , सदगर , भिमाशंकर बनसोडे, विठ्ठल घोरपडे . पोलिस पाटील म्हणून -दत्तात्रय पायगुडे, भारती उंद्रे, महसूल सेवक- तुषार मुथा , वाहक -बाळासाहेब खाडे यांचा विशेष सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!