देशातील तब्बल ३४५ राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई सुरु…

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकाही निवडणुकीत सहभागी न झालेल्या आणि प्रत्यक्षात कार्यालय नसलेल्या पक्षांवर ही कारवाई करण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच २०१९ पासून एकाही निवडणुकीत सहभाग न घेतलेले, आणि देशभरात प्रत्यक्ष कार्यालय नसलेले ३४५ पक्ष या यादीत आहेत. हे सर्व पक्ष देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.२०१९ पासून एकाही निवडणुकीत सहभाग न घेतलेले, आणि देशभरात प्रत्यक्ष कार्यालय नसलेले 345 पक्ष या यादीत आहेत. हे सर्व पक्ष देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत आहेत.
राजकीय पक्षांची नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम 29अ अंतर्गत होते. नोंदणीनंतर त्या पक्षांना कर सवलतींसह अनेक सुविधा मिळतात. मात्र अनेक पक्ष या सुविधांचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही मोहीम राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्यासाठी हाती घेतली आहे.
दरम्यान, ही कारवाई ३४५ पक्षांपुरतीच मर्यादित राहणार नसून, हा उपक्रम टप्प्याटप्प्याने सुरूच राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. भविष्यात अधिक पक्ष रडारवर येण्याची शक्यता आहे, विशेषतः जे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नाहीत व फक्त नावापुरते अस्तित्वात आहेत.