आरबीआयचे सर्व बँकांना निर्देश; येत्या ३१ मार्चपर्यंत बँकांना एकही सुट्टी नाही! रविवारीही चालणार काम…!


मुंबई : २०२२-२०२३ चं आर्थिक वर्ष सुरु होण्यास अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. १ एप्रिलपासून नवीन फायनेंशियल ईयर सुरु होणार आहे. याचदरम्यान वर्षभरातील सर्व खर्चांचा हिशोब केला जातो. अशा परिस्थितीत रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान , ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये क्लोजिंगचे काम केले जाते. यासोबतच सध्या ऑनलाइन बँकिगही सुरु राहील. ३१ मार्चनंतर सलग २ दिवस म्हणजेच १ आणि २ एप्रिलला बँकांमध्ये कामकाज होणार नाही. ३१ मार्चपूर्वी आधार पॅनशी लिंक करा. तुम्ही केले नसल्यास १ एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!