भाजपविरोधात आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांचे मोठ पाऊल, एकनाथ शिंदेंना धक्का बसणार का?, महत्वाची माहिती आली समोर…

पुणे : पुण्यात भाजप विरोधात रान उठवणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एक पाऊल उचललं आहे. त्यांनी घेतलेला निर्णय सोशल मिडिया संदर्भात आहे. पण त्यामुळे रवींद्र धंगेकर काय निर्णय घेणार? ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार की, पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या X अकाऊंटच्या कव्हर पेजवरुन शिवसेनेचा फोटो हटवला आहे. त्या ठिकाणी त्यांनी सत्यमेव जयतेचा फोटो लावला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललय असा प्रश्न उपस्थित होतो. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र सरकारमध्ये सहभागी आहेत.

दरम्यान, अशावेळी रवींद्र धंगेकर यांची भूमिका महायुतीला अडचणीत आणणारी आहे. ‘मी भाजप विरोधात नाही, तर विकृती विरोधात बोललो’ असं रवींद्र धंगेकर यांनी म्हंटले आहे. नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असे वाटत नाही, असे मत धंगेकरांनी व्यक्त केले आहे.

तसेच एक्सच्या कव्हर पेजवर काळ्या रंगात सत्यमेव जयते लिहितांना त्याखाली पुणेकर फर्स्ट लिहले आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर आर-पारच्या पावित्र्यात असल्याचं स्पष्ट होतं. मागच्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करत आहेत. निलेश घायवळ तसच जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादातून त्यांनी पुण्यातील या दोन्ही भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.
मी भाजप विरोधात नाही, तर विकृती विरोधात बोललो’ असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही, असं मत धंगेकरांनी व्यक्त केलं. एक्सच्या कव्हर पेजवर काळ्या रंगात सत्यमेव जयते लिहितांना त्याखाली पुणेकर फर्स्ट लिहिलं आहे.
दरम्यान, त्यामुळे रवींद्र धंगेकर आर-पारच्या पावित्र्यात असल्याचं स्पष्ट होतं. मागच्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करत आहेत. निलेश घायवळ तसच जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादातून त्यांनी पुण्यातील या दोन्ही भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.
