Ratan Tata : ….म्हणून रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही!! वाचून वाटेल आश्चर्य


Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

रतन टाटांनी संपूर्ण आयुष्य सिंगल म्हणून व्यतित केले, आणि त्यांच्या विवाह न करण्यामागे एक अद्भुत प्रेम कथा आहे. अमेरिकेत काम करत असताना त्यांनी एका मुलीच्या प्रेमात पडले, पण नशिबाने त्यांना भारतात परतावे लागले. त्यांच्या आजींच्या प्रकृतीची चिंता असल्यामुळे त्यांना तातडीने भारतात जावे लागले.

त्यांच्या प्रेमिका भारतात येणार होती आणि दोघे लग्न करणार होते. परंतु भारत-चीन वादामुळे तिचे येणे अयशस्वी झाले. तिचे आयुष्य वेगळ्या पद्धतीने पुढे गेले, आणि तिने अमेरिकेत लग्न केले. या घटनेनंतर रतन टाटा यांनी सिंगल राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, त्यांनी आयुष्यात चार वेळा प्रेमात पडले, परंतु विवाह न होण्यामागे नेहमीच काही कारणे होती.

रतन टाटा एक उदार व्यक्तिमत्व होते. त्यांचे श्वानांवरील प्रेम आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ते ओळखले जातात. त्यांनी नवी मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी एक अत्याधुनिक हॉस्पिटल उघडले, ज्यासाठी त्यांनी १६५ कोटी रुपये खर्च केले. टाटा समूहाच्या कमाईपैकी ६६% भाग चॅरिटेबल ट्रस्टला देण्याची प्रथा त्यांच्यात होती, ज्यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!