चॉकलेटच्या नावाखाली उंदीर शेक!! पुण्यातील कॅफेत धक्कादायक प्रकार आला समोर…

पुणे : एका कॅफेमध्ये चॉकलेट शेखच्या नावाखाली ‘उंदीर शेख’ दिल्याचा घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोहगाव येथील एका कॅफेमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.
व्हेलेंटाईन डे निमित्ताने दोन विद्यार्थ्यांनी फुड ॲपवरूवन चॉकलेट शेक ऑर्डर केला होता. मात्र, शेकमध्ये मृत उंदीर पाहून त्यांना धक्काच बसला. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत रूग्णालयात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातीस लोहगावमधील दोन विद्यार्थ्यांना चॉकलेट शेख पिण्याची इच्छा झाली. त्यांनी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी ऑनलाइन फुड ॲपद्वारे चॉकलेट शेख ऑर्डर केली होती. काही वेळातच डिलिव्हरी बॉय चॉकलेट शेख घेऊन आला. त्यातील २१ वर्षीय विद्यार्थी ते चॉकलेट शेख प्यायला.
तो संपूर्ण शेख प्यायला. नंतर त्याला ग्लासच्या तळाशी उंदीर आढळला. यानंतर मुलगा घाबरला. तातडीने विद्यार्थ्याने रूग्णालयात धाव घेतली. दवाखान्यात जात त्याने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. तरूणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याने तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंदीर चुकून मिक्सरमध्ये पडला असावा. कॅफेमधील कर्मचाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे शेक तसंच पार्सल करण्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत