Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल, रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी..


Rashmi Shukla मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

तर, रजनीश सेठ यांच्या जागी फोन टॅपिंग प्रकरणामुळं वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरण्याची शक्यता आहेत.

रश्मी शुक्ला या देखील १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या राज्याच्या पोलीस महासंचालक बनल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती.

रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप करुन त्यांच्या संभाषणाची माहिती देवेंद्र फडणीस यांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पुण्यात पोलीस आयुक्त असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी कोर्टात रश्मी शुक्ला यांनी भूमिका मांडल्यानंतर कोर्टाने हे दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते. याशिवाय सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणातही सर्व कारवाई थांबवण्यात आली होती. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!