अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईने जबरदस्तीने लावून दिले लग्न; आईला अटक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर जबरदस्तीने तिच्याशी लग्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडितेवर अत्याचार करणारा तरुण आणि त्याचा साथीदार दोघे फरार असल्याची माहिती आहे.
समाधान शिवाजी गायकवाड (वय २५, रा. घेरडी, ता. सांगोला), पीडितेची आई आणि स्वप्नील तानाजी दशवंत (वय २१, रा. घेरडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात पॉक्सो कायद्यातील तरतुदीनुसार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील या गावांतील जमीनदारांचे नशीब बदलणार, भूसंपादन झाल्यावर दोन दिवसांत मिळणार पैसे
मिळालेल्या माहिती नुसार, मिरज तालुक्यातील एका गावात राहणारी आरोपी आईने पीडित मुलीला नात्यातीलच विवाहित व्यक्तीकडे २०२१ मध्ये घेरडी येथे पाठवले. त्या ठिकाणी संशयिताने धमकावून पीडितेला जत तसेच घेरडी येथे पुन्हा अत्याचार केले. काही दिवसांनी संशयित समाधान गायकवाड, पीडितेची आई यांनी स्वप्नील दशवंत याच्या गाडीतून पीडितेला जेजुरी येथे नेले. (२३ एप्रिल) रोजी तिचे जबरदस्तीने समाधान याच्याशी लग्न लावले.
शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी?, खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायला तयार; कारण
त्यानंतर पीडितेने सांगली ग्रामीण पोलिसांना आपल्यावरील अत्याचाराच्या घटना सांगितल्यानंतर तिची फिर्याद दाखल करून घेतली. त्यानंतर बुधवारी (ता.७) तिच्या आईला अटक केली. मुख्य संशयित समाधान गायकवाड आणि स्वप्नील दशवंत या दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.