Ramesh Bais : मोठी बातमी! आता राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपालांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…


Ramesh Bais : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील सल्ला दिला आहे. मंगळवारी (ता.५) राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीचा संदर्भ देत शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

रमेश बैस म्हणाले, सध्या जीवनशैली बदलली आहे त्यामुळे सर्वांच्या झोपेची वेळ देखील बदलली आहे. मुलं मध्यरात्रीपर्यंत जागी असतात मात्र त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. मात्र मुलांना चांगली झोप मिळावी या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करायला हवा असे रमेश बैस म्हणाले आहेत. Ramesh Bais

मंगळवारी (ता.५) राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलेल्या भाषणात राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपली मतं मांडली.

राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळेसंदर्भात सूचना केल्या आहे. “ई-वर्गांना चालना देणे गरजेचे आहे. यामध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल

गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असे बैस म्हणाले आहे. यामुळे राज्यातील शाळेचे वेळ बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!