Ram Temple Threat : ब्रेकिंग! श्रीराम मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट…


Ram Temple Threat : अयोध्येत श्रीराम मंदिर सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संपल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हा मेल मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

या धमकीच्या मेलमध्ये लिहिले आहे की, देवेंद्र तिवारी महान गोसेवक बनले, ते अनेकवेळा पळून गेले. आमचे लोक यूपीत पोहोचले आहेत, आता ना राम मंदिर, ना देवेंद्र तिवारी, ना योगी, त्यांच्यावर बॉम्बफेक होईल. जे तयारी करत आहेत. उत्सवासाठी, आम्ही त्याचे शोकात रूपांतर करू. Ram Temple Threat

भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत: आयएसआयशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी यूपी-११२ च्या इन्स्पेक्टरच्या तक्रारीवरून सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांसह एटीएस तैनात करण्यात आली असून ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!