Rajvir Singh : मोठी बातमी! ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप खासदाराचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन..
Rajvir Singh : सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच भपसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. राजवीर दिलेर यांच्यावर अलीगडच्या वरुण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
खासदार दिलर हे त्यांच्या अलिगड येथील निवासस्थानी असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खासदार राजवीर सिंग दिलर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. राजवीर सिंग दिलर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. Rajvir Singh
सायंकाळी सुरक्षा विहार येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजवीर दिलेर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हाथरसमध्ये शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राजवीर सिंग दिलर २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर हातरस मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. या जागेवरून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली आहे.