Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नरेंद्र मोदी यांना भेटणार, भेटीचे कारणही सांगितलं….

Raj Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
तसेच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचही राज ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून झाली, अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतरचा महाराष्ट्र बघा आणि त्याआधीचा महाराष्ट्रा बघा. महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती. कधी आमच्या संतांची विभागणी आडनावांमध्ये झाली नव्हती. जातीमध्ये बघितल जात नव्हतं. संतांकडे संत म्हणून पाहिल जात होते. Raj Thackeray
या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. याआधी महाराष्ट्र असा कधी नव्हता. जे जातीय विष पसरवल गेलं, त्याची सुरुवात ९९ पासून झाली, असं राज ठाकरे म्हणाले.
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार…
राज ठाकरे यांनी यावेळी मीडियाशी बोलताना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरच भेटणार असल्याच राज ठाकरे यांनी सांगितले आहे.