मोठी बातमी! राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, कसबा निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर करणार…!


पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत मनसे देखील मैदानात उतरणार असून सोमवारी कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच समजेल. याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत.

मनसेकडून सध्या कसब्यात अजय शिंदे, गणेश भोकरे, गणेश सातपुते, आशिष देवधर, निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे आदींची नावे चर्चेत आहे. भाजपकडून सध्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

कसबा विधानसभेसाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आम आदमी देखील याठिकाणी निवडणूक लढवणार आहे. यामुळे रंगत वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!